मुंबईवाल्यांनी वाढविला घोर, पुन्हा आले सहा पाॅझिटिव्ह

राजेश दारव्हेकर
शनिवार, 23 मे 2020

जिल्‍ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८ वर गेली असल्याची माहिती जिल्‍हा 
शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

हिंगोली :  जिल्‍ह्यात औंढा नागनाथ तालुक्‍यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्‍तीसह वसमत तालुक्‍यातील पाच व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी (ता. २३) सकाळी प्राप्त झाला आहे. यामुळे आता जिल्‍ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८ वर गेल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी सांगितले. 

मागील चार दिवसांपूर्वी मुंबईहून गावी परतलेल्या ४५ वर्षीय एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला औंढा येथील कोविड केअर सेंटर येथे भरती करून उपचार सुरु केले आहे. तर इतर पाच रुग्ण वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. हे पाच जण मुंबई येथून कनेन्टमेन्ट झोनमधून आल्यानेच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी यांनी अहवालाअंती सांगितले.

हेही वाचाकोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शतक गाठले

या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी शतक गाठले होते. परंतु जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पोलीस दल आदी विभागाने तातडीने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळेच ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता केवळ १८ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर कोविड सेंटर येथे उपचार सुरु आहेत. २७३ अहवाल अद्यापही येणे बाकी आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे श्रीवास यांनी सांगितले.  

आता १८ रुग्ण उपचार घेत आहेत.

मागच्या काही दिवसांपुर्वी कमी होत असलेली कोरोना बाधीतांची संख्या आता मात्र वाढत असल्याचे चित्र आहे. यात मुंबई येथून येणारे बहुतांश रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. जिल्‍ह्यात आता कोरोना बाधीतांची एकूण संख्या १०७ वर गेली आहे. यातील ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना सुट्टी देण्यात आली आहे. आता १८ रुग्ण उपचार घेत आहेत. 

येथे क्लिक करा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

महत्‍वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नये

नागरिकांनी अत्यंत महत्‍वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नये व 
अत्‍यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, तसेच जनतेने आपल्या मोबाईल वर आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करून घ्यावे.  जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करेल, असे आवाहनही डाॅ. श्रीबास यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbais passenger increased the horror, again came six positives hingolinews