Umarga Municipal Building : पालिकेच्या इमारतीचे पाच वर्षांपासून भिजत घोंगडे; उमरगा,८० लाखांचा निधी गेला परत
Umarga : उमरगा नगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच थांबले आहे. निधी शासनाकडे परत गेला असून, आता नवीन निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
उमरगा : उमरगा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होऊन पाच वर्षे झाली तरी बांधकाम पूर्णत्वाकडे जात नाही. पालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यात सकारात्मक समन्वय नसल्याने गेली दीड वर्षापासून काम बंद आहे.