
नांदेड : बारड (मुदखेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिकुट येथे एकाचा डोक्यात काठी मारून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तर, दुसऱ्या घटनेत पुयनी (ता.नांदेड) शिवारात भावासोबत भांडण का केलेस, असे म्हणत एका १९ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. यातील आरोपीस पोलिस कोठडी मिळाली आहे. अदित्य तुकाराम पंतगे (वय १९) व तेजूसिंग ऊर्फ (तेज्या बांगा) कुलवंतसिंग चाहेल (वय ३८) असे मृताचे नाव आहे.