सख्ख्या भावानेच खून केल्याचे उघड

युवराज धोतरे 
शुक्रवार, 24 मे 2019

उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, की बुधवारी (ता.22)  मध्यरात्री सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी यांचा दगडाने ठेचून खून झाला होता. याबाबत गुरुवारी (ता.23) येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मयत सतीश हा अनेक व्यसनाच्या आहारी गेला होता. सतत आई व भाऊ सुधीर आणि कुटुंबातील सर्वांना दारू पिऊन त्रास देत होता. प्रचंड प्रमाणात पैशाचा अपव्यय करत होता. त्यामुळे सर्व कुटुंब याच्या वागणुकीमुळे हैरान झाले होते. त्यामुळे वैतागून तसेच घर वाचवण्यासाठी सतीशच्या खुनाचा कट रचला व मध्यरात्री उठून तो गाढ झोपल्याचे पाहून बाहेरून मोठा दगड आणून त्याच्या डोक्यात घातला व मी निघून गेलो, अशी कबुली आरोपीं सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याने दिल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी भिमाशंकर हिरमुखे यांनी सांगितले.

यासाठी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, बप्पा कुलकर्णी, शिवाजी केंद्रे, नामदेव सारोळे, राहुल गायकवाड, चंद्रकांत कलमे, नाना शिंदे व विष्णु गीते यांनी पुढाकार घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder by real brother at Udagir