esakal | धारदार शस्त्राने बीडमध्ये पत्नीचा खून, आरोपी स्वत: ठाण्यात हजर  
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

शहरातील गॅरेज लाईन भागात राहणाऱ्या ऊर्मिला मस्के व पती रमेश मस्के यांच्यात रात्री वाद झाला. यानंतर रागाने ऊर्मिला मस्के जालना रोडच्या दिशेने गेली. रमेश मस्केही हातात कत्ती घेऊन मागे गेला. हिना पेट्रोलपंपाजवळ त्याने कत्तीने तिच्या डोक्यात व इतर भागावर वार केले.

धारदार शस्त्राने बीडमध्ये पत्नीचा खून, आरोपी स्वत: ठाण्यात हजर  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने डोक्यात वार करून पत्नीचा खून करून आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. जालना रोडवरील हिना पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (ता. २९) रात्री ही घटना घडली. ऊर्मिला रमेश मस्के (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

शहरातील गॅरेज लाईन भागात राहणाऱ्या ऊर्मिला मस्के व पती रमेश मस्के यांच्यात रात्री वाद झाला. यानंतर रागाने ऊर्मिला मस्के जालना रोडच्या दिशेने गेली. रमेश मस्केही हातात कत्ती घेऊन मागे गेला. हिना पेट्रोलपंपाजवळ त्याने कत्तीने तिच्या डोक्यात व इतर भागावर वार केले. यात ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही.