मोठ्या भावाकडून छोट्या भावाचा खून; आरोपीस 12 तासात अटक

murder of a younger brother by an older brother in Biloli osmanabad
murder of a younger brother by an older brother in Biloli osmanabad

बिलोली (उस्मानाबाद) : घरगुती कारणावरुन मोठ्या भावाने व त्याच्या पत्नीने छोट्या भावाच्या डोक्यात लोखंडी खुसा खालुन खुन केल्याची घटना बिलोली तालुक्यातील कासराळी येथे मंगळवारी (ता.पाच) रात्री 09च्या दरम्यान घडली. घटना घडताच दोन्ही आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले होते, पण बिलोली ठाण्याचे पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांनी रात्रभर तपास लावत आरोपीस 12 तासात अटक केली आहे. 

तालुक्यातील कासराळी येथील धोबी समाजातील इबितवार बंधुत गेल्या काही दिवसापासुन एकमेकांना शिव्या देण्याच्या कारणावरुन कौटुंबिक वाद चालला होता. हा वाद इतक्या टोकाला गेला की या वादाचे रुंपातर मंगळवारी (ता.पाच) रात्री खुनात झाले. मोठा भाऊ हनमंत मष्णाजी इबितवार (वय ७०) याने व त्याची पत्नी आनशाबाई हनमंत हिच्या मदतीने आपल्या छोट्या भावाच्या डोक्यात लोखंडी खुशाने वार केले. यात लक्ष्मण मष्णाजी इबितवार (वय ५०) हा जागीच ठार झाला.

धक्कादायक ! पुण्यातील हॉटेलच्या लेडिज वॉशरुमध्ये छुपा कॅमेरा; मुलींचे केले चित्रिकरण

शेजाऱ्यांनी लक्ष्मण यास बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ. नागेश लखमावार यांनी लक्ष्मण यास मयत घोषीत केले. तर भांडण सोडवण्यास गेलेल्या मयताच्या पत्नीच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले. भाऊ मयत झाल्याची माहिती मिळताच आरोपी हनमंत पत्नीसह त्याच रात्री पसार झाला.

चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षपद जाणार

बिलोली पोलिस घटनास्थळी आले असता आरोपी फरार झाल्याचे दिसून आले. त्याच रात्री ठाण्याचे पोलिस निरिक्षक भगवान धबडगे हे रात्रभर आरोपीची शोधाशोध करुन सकाळी सात वाजता आरोपीची सासरवाडी लातुर जिल्हातील जळकोट तालुक्यातील कुनकी येथुन आरोपीस अटक केली. या प्रकरणी बिलोली पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल केला असून धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रामदास केंद्र हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com