चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून मोठा धक्का; पद जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.

भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.मुनगंटीवार म्हणाले की, 'जनादेश हा महायुतीला मिळाला असून, महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे. उद्या आम्ही राज्यापालांना भेटणार असून सत्तास्थापनेबाबत चर्चा करणार आहोत. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून भेटणार असून आमचं प्रत्येक पाऊल हे सत्तास्थापनासाठीच असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

धक्कादायक ! पुण्यातील हॉटेलच्या लेडिज वॉशरुमध्ये छुपा कॅमेरा; मुलींचे केले चित्रिकरण

मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना, भाजप, RPI आणि मित्रपक्ष यांना जनादेश मिळाला आहे. जनादेशचा सन्मान व्हावा अशी भूमिका भाजपची आहे. आम्ही निर्णय घेतला की महायुतीचे सरकार येण्यासाठीच भाजपचे पाऊल असेल. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत राज्यपाल यांना भेटायला जाणार आहोत, चर्चा करायला जाणार आहोत
भाजप कार्यकर्ते यांनी गावागावात जात शेतकरी समस्येवर ओला दुष्काळबाबत काम करेल असं ठरलं आहे.

पत्नीने घेतला गळफास, अन् पतीने....

प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर याबाबत निर्णय झाला असून यावेळी पक्षाध्यक्ष बदलला जातो. तसेच, 91 हजार बूथ अध्यक्षांचीही निवड होईल, भाजप जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना का भेटणार यावरून मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will announce new state president by December 31