Papaya Orchard with Rotavator
sakal
पाचोड - मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षेने लागवड केलेल्या पपईच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली, त्यातच अतिवृष्टीने थैमान घातले, अन् याचा फटका फळबागांवर होऊन पपई उत्पादकाच्या नशिबी निराशा येऊन मुरमा (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने पपईला योग्य दर मिळत नसल्याने चक्क दोन एकरांवरील उभ्या पपईच्या बागेवर रोटाव्हिटर फिरवला.