

Suspicious Death of Teen Girl Shocks Murmi Village
sakal
शेंदुरवादा : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी उघडकीस आली. वैष्णवी संतोष निळ (वय १७) असे मृत तरुणीचे नाव असून ती वाळूज येथील विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही नेहमीप्रमाणे वाळूज येथील महाविद्यालयातून घरी आली होती. त्यानंतर तिचे आईसोबत बोलणेही झाले होते.