मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये शासनाच्या सूचनांचे पालन करावे- विजकुमार मगर 

फोटो
फोटो

नांदेड : राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. त्यामुळे ता. २५ एप्रीलपासून सुरू होणाऱ्या रमजान महिण्यात मुस्लीम बांधवांनी लॉकडाउनच्या काळात शासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. 

शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ता. १४ मार्चपासून साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ लागू करण्यात आलेला आहे. ता. १४ मार्चच्या अधिसूचना या संदर्भातील नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून ता. १७ एप्रिलच्या आदेशान्वये एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

मशिदीमध्ये जाऊन नमाज पडु नये

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत ता. १४ मार्च रोजी अधिसूचना देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त शासनाने दिलेल्या सूचनांचा अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना ता. २५ एप्रिलपासून सुरु होत आहे. रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तार पार्टीसाठी नागरिक एकत्र येतात. सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते. 

खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे

ँ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे पवित्र रमजान महिन्यांमध्ये काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणी करण्यात यावी.
ँ कोणत्याही परिस्थितीत मुस्लिमांनी मशिदीमध्ये नियमित नमाज पठण तसेच इतर पार्टीसाठी एकत्र येऊ नये.
ँ घराच्या किंवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इतर पार्टी करण्यात येऊ नये.
ँ मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इतर पार्टी करण्यात येऊ नये.
ँ लोकांकडून कोणत्याही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरे होणार नाही याची काळजी घ्यावी. 
ँ सर्व मुस्लिम बांधवांनी घरांमध्ये नियमित नमाज पठण करावे व इतर पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडून इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ट करू नये.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

वरील सूचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करून आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेले कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवूया. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोनाविरुद्धचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगुया. असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com