
कनेरगाव नाका : ‘‘जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली.’’ या संत नामदेव महाराजांच्या ओवीचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना सध्या वारी मार्गावर दिसून येत आहे. महिनाभरापासून एक श्वान वेगवेगळ्या पालख्यांबरोबर पंढरपूरच्या दिशेने चालत जात असल्याचे वारकऱ्यांच्या लक्षात आले.