esakal | अंबाजोगाई : केंद्रेवाडीतील गुढ आवाज भुकंपाचे नाही
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

अंबाजोगाई : केंद्रेवाडीतील गुढ आवाज भुकंपाचे नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : केंद्रेवाडीतील ते गुढ आवाज भुकंपाचे नसून, जमीनीत निर्माण झालेल्या पोकळीत पाणी शिरले, की असे आवाज येतात असा प्राथमिक निष्कर्ष भुजल सर्वेक्षण अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी अंती काढल्याचे तलाठी माधुरी स्वामी यांनी सांगितले.

तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात सोमवारी (ता.६) दुपारपासून जमीनीतून गुढ आवाज येत आहेत. ग्रामस्थांचा हे भुकंपाचे तर आवाज नाहीत ना ? असा समज झाला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण होते. याची माहिती कळताच अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील यांनी मंगळवारी (ता.७) दुपारी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. आवाज कसे होते, याचीही माहिती त्यांनी घेतली. याचे कारण स्पष्ट होण्यासाठी बीडच्या भुजल सर्वेक्षण अधिकारी प्रिया गाडेकर यांना पाचारण केले होते.

marathwada

marathwada

भुजल अधिकाऱ्यांची पाहणी

दुपारी साडेचार ते पावने पाचच्या दरम्यान भुजल सर्वेक्षण अधिकारी गाडेकर यांनी केंद्रवाडी येथे दाखल होत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी ग्रामस्था समक्ष गावातील तलाव, कोरड्या विहीरी व विंधन विहिरींची पाहाणी केली. या पाहणी नंतर त्यांनी हे भुकंपाचे आवाज नसून, जमीनीत निर्माण झालेल्या पोकळीत पाणी शिरले की असे आवाज येऊ शकतात. ज्या पाचशे फुट खोल कोरड्या विंधन विहिरी आहेत, त्यातही अशा भेगा निर्माण झालेल्या असतात, त्यात पाणी शिरले की असे मोठे आवाज येतात. असा निष्कर्ष त्यांनी काढल्याचे तलाठी माधुरी स्वामी यांनी सांगितले. या बाबत सायंकाळी प्रत्यक्ष गाडेकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असता त्यांचा फोन बंद येत होता.

ग्रामस्थांनी दक्षता पाळावी

दुपारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या भेटीत त्यांनी, ग्रामस्थांना यात भूकंपाची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले होते.

loading image
go to top