esakal | केंद्रेवाडीत गुढ आवाजाने भीतीचे वातावरण; नागरिकांनी काढली रात्र जागून
sakal

बोलून बातमी शोधा

बीड

केंद्रेवाडीत गुढ आवाजाने भीतीचे वातावरण; नागरिकांनी काढली रात्र जागून

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड): तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात सोमवारी (ता.६) दुपारपासून जमिनीतून गुढ आवाज येत आहेत. रात्रीही असे आवाज आल्याने ग्रामस्थ बाहेर येऊन थांबले होते. याच्या पाहणीसाठी मंगळवारी (ता.७) दुपारी तहसीलदार व तलाठी या केंद्रेवाडीकडे निघाले होते. अंबाजोगाई ते आडस रोडवर हे केंद्रेवाडी गाव आहे. या गावात जमिनीतून आवाज येत असल्याने भुकंप होतो की काय? या भितीने ग्रामस्थांनी सोमवारी रात्र जागून काढली. सोमवारी दुपारपासून गावाच्या चारही दिशेला असे गुढ आवाज येत होते. त्यामुळे घराचे पत्रेही हादरत होते.

या आवाजाने नागरिकांत भीतीचे वातावरण आहेत. रात्री दीड, पहाटे चार, सकाळी ९.३० वाजता असे गुढ आवाज आले. याबाबत तलाठी व तहसीलदार यांना माहिती दिली असल्याचे ग्रामस्थ बाळासाहेब केंद्रे यांनी सांगितले. सोमवारी दुपारी व रात्री केंद्रेवाडी गावात गुढ आवाज येत असल्याचे ग्रामस्थांकडून कळाले, परंतू हे आवाज कशाचे आहेत. याची खात्री व पाहणी करण्यासाठी केंद्रेवाडी येथे आपण पाऊस असला तरी प्रत्यक्ष भेट देत असल्याचे तहसीलदार विपीन पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top