
धाराशिव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभऱ्याची हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दराने विक्री केली. आता शेतकऱ्यांकडे फारसा हरभरा शिल्लक नाही. त्याशिवाय खुल्या बाजारात हमीभावाइतका दर मिळत असताना ‘नाफेड’ला उशिरा जाग आली आहे. हरभरा खरेदीसाठी आता नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वरातीमागून घोडे नाचविण्याचा हा प्रकार असल्याची टीका शेतकऱ्यांतून होत आहे.