नळदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी सज्ज;दीर्घ प्रतीक्षेनंतर किल्ला खुला

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले

नळदुर्ग (उस्मानाबाद): येथील भुईकोट किल्ला तब्बल नऊ महिन्यांनंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पुरातत्त्व खात्याशी करार केलेल्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्याच्या उद्देशाने किल्ल्यात जागोजागी फलक लावले आहेत.

प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभे केले आहेत. शनिवारपासून (ता. १९) किल्ल्यात पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले.

'ये तो किस्मत है भाई...' पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानातील राखेतुन सोनं शोधण्याची धडपड

दरम्यान, यंदा १४ ऑक्टोबरला अतिवृष्टीने पाणी महालावरील संरक्षक कठडे वाहून गेले होते. पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक अजितकुमार खंदारे यांच्या पथकाने किल्ल्यातील नुकसानीची पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. मात्र, पुरातत्त्व खात्याने डागडुजी केली नाही. त्यामुळे युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने या ठिकाणी स्वखर्चाने डागडुजी केली आहे. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर हा किल्ला खुला होणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naldurd fort reopened usamanabad news good news for tourists