नळदुर्ग किल्ल्याचे वैभव पुस्तक रुपाने, राज्यासाठी दस्तऐवज

नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग किल्ला
Summary

नळदूर्ग किल्ल्याचे सौंदर्य अनेकांच्या नजरेत भरते. विशेषतः पावसाळ्यात येथील नर-मादी म्हणून ओळख असलेला धबधबा सुरू होतो. तेव्हा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटते. इतकेच काय ते किल्ल्याचे महत्त्व पर्यटकांना माहिती असते.

उस्मानाबाद : नळदूर्ग (ता.तुळजापूर) येथील किल्ला Naldurg Fort राज्यासह कर्नाटक Karnataka, तेलंगणा Telengana येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. याशिवाय किल्ल्याचे आगळे-वेगळे वैभव पुरातत्त्वचे अभ्यासक तथा इतिहास संशोधन परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयराज खोचरे Archology Scholar Jayaraj Khochare यांनी पुस्तक रुपाने मांडला आहे. यातून अनेक नव्या ऐतिहासिक घटनांचा उलगडा केल्याने पर्यटक आणि इतिहास प्रेमींच्या ज्ञानात भर पडणार आहे. जिल्ह्यातील Osmanabad नळदूर्ग किल्ल्याचे सौंदर्य अनेकांच्या नजरेत भरते. विशेषतः पावसाळ्यात येथील नर-मादी म्हणून ओळख असलेला धबधबा सुरू होतो. तेव्हा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटते. इतकेच काय ते किल्ल्याचे महत्त्व पर्यटकांना माहिती असते. पण, याशिवाय या किल्ल्याचे काय वैभव आहे. किल्ल्याची रचना कशी तयार केली आहे. पाणी महल काय आहे. त्याची तांत्रिक रचना कशी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महलाचे महत्त्व कसे आहे. संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम विविध काळात, वेगवेगळ्या वेळेत पूर्ण केले आहे. याबाबतचा संपूर्ण आढावा श्री. खोचरे यांनी त्यांच्या `दूर्ग नळदूर्ग` या पुस्तकात केला आहे.एकेकाळी जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नळदूर्ग किल्ल्याला वेगळा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक मोठा असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम टप्प्याटप्प्याने झाले आहे. १३ व्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले. बहमनी काळात या किल्ल्यावर इस्लामिक सत्ता होती. त्यानंतर आदिलशाहीने Adilshah या किल्ल्यावर ताबा मिळविला. अबूल मुजफ्फर अली आदिलशाह याने १५५८ मध्ये या किल्ल्याला भेट दिली. त्याच वेळी ख्वॉजा नियतुल्ला याने १५५८ ते १५६० या दोन वर्षात किल्ल्याची पूनर्बांधणी केली. तर दुसरा इब्राहिम आदिलशाह याच्या काळात पाणीमहल बांधण्यात आला आहे.naldurg fort now see through book osmanabad

नळदुर्ग किल्ला
कारहुन्नवी सणावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट

नर-मादी धबधबा

नदी रणमंडळ किल्ल्याकडून वाहत होती. ती नदी किल्ल्याच्या बाजूने घेतली. पाण्याचा वेग कमी करण्यासाठी त्याला झेड आकार दिले आहेत. त्यामुळे पाणी महलच्याजवळ पाणी एकदम संथ होते. एक सांडवा कमी उंचीवर आहे. त्याला मादी धबधबा म्हणतात. त्यातून सरळ दिशेने पाणी वाहते. त्यानंतर पाण्याची धरणातील आवक वाढली तर मोठा धबधबा (नर) वाहतो. त्यामुळे पाणी महलचे (धरणाचे) संरक्षण होते.

उपळ्या बुरुज

किल्ल्यावरील सर्वात ऊच बुरूज आहे. त्या ठिकाणाहून १० ते २० किलोमीटरपर्यंतच्या हालचाली स्पष्ट दिसतात. या ठिकाणाहून दूरवरील शत्रुच्या हालचाली नजरेत भरतात. बुरुजाच्या खाली एक रुम आहे. त्या ठिकाणी जगात दुर्मिळ असे शेपटी असणारे वटवाघूळ आढळते. त्याला शास्त्रीय भाषेत हार्डविकी रायनोकोमा असे म्हणतात.

पाणी महलाचे बांधकाम

ऐतिहासिक काळात लढाई समोरासमोर होत असे. त्यावेळी शत्रुला ठावठिकाणा लागू नये, यासाठी विविध पद्धतीच्या छुप्या मार्गाचा अवलंब केल जात होता. नळदूर्ग किल्ल्यातील पाणी महल अशीच एक वास्तु शेकडो वर्षानंतरही जशीच्या-तशीच आहे. अनेक ठिकाणच्या इमारतीचे जीवन केवळ ५० ते १०० वर्षापर्यंतच असते. परंतु १६१३ मध्ये बांधलेल्या प्रसिद्ध असा पाणीमहल अद्यापही सुस्थितीत आहे. शेकडो वर्षानंतरही या वास्तुला काहीच झालेले नाही. त्यामुळे त्याचे बांधकाम किती शास्त्रशुद्ध पद्धतीने पद्धतीने बांधले असेल, याचा अंदाज आपल्याला येतो. विख्यात वास्तुविशारद परशीयन मीर इमादिन याने १६१३ मध्ये पाणीमहल बांधला.

नळदुर्ग किल्ला
गावनिहाय काम उभा करावे, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला

चकवा देणाऱ्या पायऱ्या

पाणी महलाची रचना तीन मजली आहे. तर महलाची एक बाजू सरळ आहे. पाण्याच्या बाजूने अर्धचंद्राकृती रचना आहे. या महलामध्ये काही पायऱ्या अशा आहेत की, त्या दिसतच नाहीत. नवीन माणूस आल्यानंतर त्याला याचा अंदाज येत नाही. काही झरोके असून त्यातून प्रकाश येतो. तो डोळ्यावर पडल्याने अंधारी येते. तो व्यक्ती तिथे अडखळतो आणि खाली पडतो. त्याचा आवाज महलात असणाऱ्या व्यक्तिला येतो. त्यामुळे तो सतर्क राहतो. परिणामी पाणी महलामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चांगला उपयोग केला जात होता. महलाच्या बांधकामापासून एकदाही पाणी महल गळलेला नाही. पाऊस जास्त झाल्यानंतर काही वेळा महलाच्या वरून पाणी पडते तरीही पाण्याचा प्रवाह तसेच महलात कोठेही पाणी पाझरत अथवा झिरपत नाही.

वैज्ञानिक रचना

किल्ल्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात लोक राहत असत. त्यांच्या जेवणाची सोय करावी लागत असे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्यावर पिठाची चिक्की चालविली जात असे. त्याच्याही खुणा आढळत असल्याचा उल्लेख खोचरे यांनी पुस्तकामध्ये केला आहे. अगदी पूरात काळातही पडद्याआड असलेले विज्ञान खोचरे यांनी संशोधनातून पुस्तक रुपाने मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com