Water Storage: नळदुर्ग पाटबंधारे क्षेत्रातील ३२ साठवण तलावांपैकी १५ पूर्ण क्षमतेने भरलेले
Naldurg: नळदुर्ग पाटबंधारे क्षेत्रातील ३२ साठवण तलावांपैकी १५ पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरी (कुरनूर) आणि खंडाळा मध्यम प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठ्याचे मुख्य स्त्रोत आहेत.
नळदुर्ग : येथील पाटबंधारे कार्यालय क्षेत्रातील ३२ पैकी १५ साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. बोरी (कुरनूर) आणि खंडाळा या दोन्ही मध्यम प्रकल्पांचा यात समावेश आहे, तर सात साठवण तलावही लवकरच भरण्याची शक्यता आहे.