Rename of Aurangabad, Osmanabad : औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतर वैधच ; विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आल्याने या शहरातील लोकांना काही त्रास होईल, असे आम्हाला वाटत नाही.
Rename of Aurangabad, Osmanabad
Rename of Aurangabad, Osmanabad sakal

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आल्याने या शहरातील लोकांना काही त्रास होईल, असे आम्हाला वाटत नाही. राज्य सरकारने केलेले नामांतर वैधच आहे असे स्पष्ट करत नामांतराला विरोध करणाऱ्या विविध याचिका मुख्य न्या.देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने बुधवारी (ता.८) फेटाळून लावल्या.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जून २०२२ मध्ये ‘औरंगाबाद’चे संभाजीनगर, ‘उस्मानाबाद’चे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आघाडी सरकारने राजकीय स्वार्थासाठी हे नामांतर केले असून त्यामुळे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत शेख इस्माईल, मोहम्मद अहमद, अलिमुद्दीन शेख व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याबाबत यापूर्वी राखून ठेवलेला निकाल बुधवारी (ता.८) जाहीर केला. न्यायालयाने म्हटले की, ‘‘ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता राज्य सरकारला कोणतेही महसूल क्षेत्र रद्द करण्याची आणि त्या क्षेत्राचे नाव बदलण्याची परवानगी देते त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर नाही. सरकारने दोन जिल्हे आणि शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी वैधानिक तरतुदींचे पालन केले असा निष्कर्ष काढण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही.’’

शेक्सपिअरचे उदाहरण

उच्च न्यायालयाने आपल्या ७६ पानी निकालात विल्यम शेक्सपिअरच्या रोमिओ आणि ज्युलियेट या नाटकाचे उदाहरण दिले. ‘‘ नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो तो सुगंधित असतो. शेक्सपियरने नावाच्या स्वरूपावर सखोल निरीक्षण नोंदविले आहे. नावाने काहीही बदलत नाही. त्या गुलाबाला काहीतरी वेगळे म्हटले तरी त्याचा सुगंध देण्याचा गुणधर्म तसाच राहतो. फुलाचे सार काही बदलत नाही,’’ असे खंडपीठाने नमूद केले.

Rename of Aurangabad, Osmanabad
Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

पुनरावलोकन अशक्य

महसूल क्षेत्र किंवा अगदी शहराच्या नावात बदल करण्याचा मुद्दा न्याय्य नाही कारण न्यायालयांकडे अशा प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती संसाधने नाहीत. जोपर्यंत एखादे प्रस्तावित नाव अन्यायकारक आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकत नाही असे खंडपीठाने नमूद करत नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com