
Maharashtra government recruitment news
sakal
विष्णू नाझरकर
जालना : शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, सिंचन कार्यक्षमतेत सुधारणा, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती आदी उद्दिष्टांसाठी राबविण्यात येणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ गेल्या अनेक महिन्यांपासून कागदावरच आहे. गावांची निवड होऊन एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटला, तरी प्रकल्पासाठी मंजूर केलेले राज्यातील १२५७ पदे अद्यापही भरलेली नाहीत.