नांदेडच्या एका कार्यकर्त्याने निष्ठा साकारली हातावर  

Nanded News
Nanded News

नांदेड :  कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता विरोधार्थी शब्दच झालाय. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असंच म्हणतात. अशावेळी निष्ठावान कार्यकर्ता या शब्दाभोवतीच सर्वकाही गुंडाळतं. नेत्यांप्रती निष्ठा राखत गाडीवर नाव टाकणे, नवस बोलणे, उपवास धरणे, व्रत धरणे अशा अनेक प्रकारे निष्ठा दाखवण्याचे प्रकार आपण नेहमी अनुभवतो. परंतु, नांदेडमध्ये एका कार्यकर्त्याने नेत्यांप्रती एका अगळ्या वेगळ्या निष्ठेचं दर्शन घडवलंय.  


राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांची एक वेगळी जमात असते. ती बऱ्याचदा पक्षाच्या, नेत्याच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊन विचारांना; पर्यायाने पक्षालाच निष्ठा वाहणारे असतात. हे थोडे शिक्षित, वाचनाची आवड, तोंडपाठ संदर्भ, पक्षाच्या मूळ विचाराला अनुसरून साधी राहणी, विचारांसाठी पूर्णवेळ कार्यकर्ते. बाहेर जग काहीही म्हणो, आपण खांद्यावरचा झेंडा, आदरणीय-माननीयसह कायम खांद्यावरच ठेवला पाहिजे. त्यांच्या आयुष्यात ‘काळ’ हा असा अचानक थांबलेला नसतो; त्याला इतिहास असतो. असाच प्रत्यय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याप्रती निष्ठेचं दर्शन घडवणाऱ्या या युवकाने घडवून आणला आहे.

निष्ठेच्या प्रदर्शनावर मात 
‘सामान्य कार्यकर्ता’ ही भाषणात, घोषणांत अत्यंत मूल्यवान असलेली गोष्ट. निष्ठेची नशा चढलेले सरफिरे, आपल्यातल्या न्यूनगंडाला स्वामीभक्तीची झालर लावून ती जळीस्थळी दिसेल अशा धडपडीत असणारे. याशिवाय साहेबांची हरप्रकारे ‘मर्जी’ सांभाळणारे; दादा, भाई, नाना, तात्या, भाऊ यांचे सर्व प्रकारचे ‘हिशेब’ सांभाळणारा कार्यकर्ता सहज ‘सामान्य’ शब्दाभोवती गुंडाळला जातो. निवडणूकीच्या काळात देवाला नवस, चप्पल,शर्ट आदी वृत, वाहनावर पक्षाचा झेंडा आणि नेत्याचा भला मोठा फोटो, वाहनावर नांव अशा विविध पैलूने निष्ठा दाखवण्याच्या खटाटोपाची जनू काही स्पर्धाच असते. अशा स्पर्धेतून चुकलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या कार्यकर्त्याने मात्र अशा प्रदर्शनावर मात करत निष्ठा राखली आहे. 

अग्रहास्तव उघड झाली निष्ठा 
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सचोटीने काही करून ‘बदल’ घडवण्यासाठी, पक्ष, संघटना वाढवण्यासाठी कुणा साहेबांचं भाषण ऐकून, कुणा साहेबांचा लोकसंग्रह पाहून, कुणा साहेबांचं सत्तेतलं वजन पाहून, तर कुणा साहेबांचं कला-संस्कृती-खेळ यावरचं प्रेम पाहून, पक्षाची जाज्ज्वल्य भूमिका पाहून, कधी आपला धर्म, कधी आपली जात, कधी प्रांत, तर कधी भाषा यांना गोंजारणारे कार्यकर्त्यांना प्रामाणिक, ध्येयनिष्ठ वाटतात आणि ते प्रचंड ऊर्जेनं त्या पक्षात सामील होत असतात. पण पक्षाच्या पलिकडे एखाद्या नेत्यांविषयी आपुलकी तेवढ्याच जिव्हाळ्यातून निष्ठा बाळगाणाऱ्या कार्यकर्त्यांचा घेणं म्हणजे निसर्गाला गवसणी घातल्यासारखंच नेत्यांना वाटत असतं. पूर्वी वाहनाच्या मागील बाजूस आमुक- तमुक बॅंकेच्या सौजन्याने असे लिहिलेले असायचे. आता मात्र त्याचा जोर कमी झाला आहे.  

वेगळेपनाचं कुतूहल 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या व्यक्ती मत्त्वावर प्रभावीत होवून एका कार्यकर्त्याने राखलेल्या निष्ठेची माहिती मिळताच त्याचे कौतुक करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु कोंढेकर यांनी त्या कार्यकर्त्यास थेट माजीमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोर उभे केले. आपल्या विषयी कार्यकर्त्यांमध्ये अशी निष्ठा असु शकते; असं त्यांनाही नवल वाटनं सहाजीकच आहे. 

हुबेहुब कलाकृतीचे दर्शन
कागद, भिंतीवरील रेखाटलेल्या चित्रांना जसा ओळखीचा आयाम मिळतो तसा शरीरावर गोंधलेल्याला (टॅट्यू) चित्राचा आकार मिळणे अपवाद म्हणावा लागेल. अशाच अपवादातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची हुबहुब प्रतिमा टॅट्यूद्वारे उतरवली आहे विनोद चव्हाण चिदगीकर यांनी. उजव्या हाताच्या मनगट आणि कोपराच्या मध्यभागी गोंधुन रेखाटलेले मजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा टॅट्यू ऑइल पेन्टींगलाही मागे सारत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com