नांदेडच्या सायकलपटूंनी केली कमाल... वाचाच...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नांदेड ते डिचपल्ली अशी सहाशे किलोमीटरची सायकल मोहिम नांदेड सायकलिस्ट ग्रुपने पूर्ण केली असून त्यात आठ सदस्यांचा सहभाग होता. 

नांदेड - नांदेड सायकलिस्ट ग्रुपच्या सायकलपटूंनी आपल्या सहकारी मित्रांसोबत नांदेड ते डिचपल्ली अशी सहाशे किलोमीटर अंतराची मोहिम नुकतीच पूर्ण केली असल्याची माहिती मोहिमेचे मार्शल चेतन परमानी यांनी दिली आहे.

नांदेड येथील काही हौशी नागरिकांनी नांदेड सायकलीस्ट ही सायकल क्लब स्थापन केली आहे. येथील अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांच्या नेतृत्वात नांदेडच्या हौशी सायकल प्रेमी युवकांचे सायकल क्लब देश विदेशी मोहिमेत सातत्याने सहभागी होत आहे. नुकतेच या समुहातील आठ सदस्यांनी सहाशे किलोमीटर अंतराची मोहिम अपेक्षित वेळात पूर्ण केली आहे.

हे ही वाचा -  वाहतूक पोलिसांनी सायकलवरून गाठले कार्यालय

३९ तासात गाठला पल्ला
नांदेड ते डिचपल्ली (तेलंगणा) व परत नांदेड असा पल्ला ३९ तासाचा रेकार्ड वेळेत गाठला. ४० तासात हे अंतर कापणे अपेक्षित होते. या मोहिमेत डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल, अझीम पंजवानी, अर्पित फलोर, गजेंद्र दरक, दीपक भुतडा, उमाशंकर चाने, राजेश वानारे, विनायक गुडेवार आदींचा सहभाग होता.

अनेक मोहिमेत सहभाग
नांदेड सायकल ग्रुपने या पूर्वी फ्रांसच्या आंतरराष्ट्रीय संस्था फेराकसशी संलग्नता प्राप्त केली आहे. या समुहाने आतापर्यंत अडक्स फ्रॉक्सच्या दोनशे ते सहाशे किलोमीटर अंतराच्या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. तसेच कन्याकुमारी ते विशाखापट्टणम, मुंबई ते गोवा, मनाली, लेह लड्डाख, सिक्कीम सारख्या दुर्गम ठिकाणापर्यंत धडक मारली आहे. २०२० म्हणजे या वर्षी विशाखापट्टनम ते कोलकत्ता ही महत्वकांक्षी मोहिम सर करण्याचे लक्ष असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - ‘प्रेमी युगुलां’च्या प्रेमाला आज येणार बहर

सायकलिंगची सवय करण्याचे आवाहन
सायकल चालवणे हे आता केवळ मनोरंजनाची बाब राहिली नाही. बालपणाची हौस आता निरोगी जीवनासाठी नितांत गरजेची बनली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तणावमुक्त व आनंददायी जीवन जगण्यासाठी सायकल चालवणे, हे लाभदायक ठरत आहे. प्रत्येकाने सवलतीनुसार दररोज सकाळ किंवा संध्याकाळी किमान एक तास सायकल चालविण्याची सवय करून घ्यावी. शरीराचे संपूर्ण संवर्धन हा व्यायाम केल्याने प्राप्त होते. स्नायू, सांधे, हाडे त्यामुळे मजबूत होतात व मसक्युलर व कार्डिओ वासक्युलर इंडोरन्स विकसित होतो. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सायकल चालविण्याची सवय अंगी बाळगावी तसेच निरोगी व आनंददायी, तणावमुक्त जीवनशैली स्वीकारावी तसेच ज्यांना नांदेड सायकल क्लब जॉईन करायची इच्छा आहे, त्यांचेही स्वागत आहे, असे आवाहन डॉ. पालीवाल आणि ट्रॅक ण्ड ट्रायलचे विवेक सावरगावकर यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded cyclists make maximum ... Read More ...