नांदेडला आजपर्यंत ७८४ कोटींची कर्जमाफी

file photo
file photo

नांदेड : मागील शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजने’त आजपर्यंत २३‘ग्रीन लिष्ट’मध्ये जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८४ कोटी ५३ लाख रुपये जमा केले आहेत. जुन्या निकषानुसार अद्यापही २१ हजार ८२६ खातेदारांची २३९ कोटी रुपयांची कर्जमाफी प्रलंबीत आहे. तर नव्या सरकारच्या ‘महात्मा ज्योतीराव फुले कृषी कर्जमुक्ती’ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण करत मे अखेर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.  


जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने ते आत्महत्येचा मार्ग अवलंबीत होते. यामुळे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे ता. एक एप्रील २००९ नंतर पीककर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले. व असे कर्ज ता. ३० जून २०१६ रोजी थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दिड लाख रुपये मर्यादेत कर्ज माफी जाहीर केली. तसेच दिड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ‘एकवेळ समझोता योजना’ (ओटीएस) योजनेअंतर्गत दिड लाख रुपयांपर्यंत लाभ दिला होता.  यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत दिड लाख रुपये जमा करावे लागले होते. पिककर्ज अनुदान योजनेत २०१५ - १६ व २०१६ - १७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची ता. ३० जून २०१६ व ता. ३० जून २०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के अथवा २५ हजार रुपये लाभ देण्यात येणार. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षात कर्जाचे पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता.


दोन लाख ६६ हजार १३३ अर्ज    
जिल्ह्यात पाच लाख पन्नास हजार ५७२ खातेदार शेतकऱ्यांपैकी दोन लाख ६६ हजार १३३ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज दाखल केले. या नंतर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जापैकी एक लाख ७६ हजार ५० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना एक हजार २३ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार होती.

चालू खातेदारांना ८७ कोटी
चालू खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के अथवा २५ हजार रुपये लाभ देण्याचे जाहीर केले होते. यानुसार चालू खातेदार असलेले ४७ हजार ५४२ शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले.

‘ओटीएस’ योजनेत २८ कोटींची कर्जमाफी
दिड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ‘एकवेळ समझोता योजना’ (ओटीएस) योजनेअंतर्गत दिड लाख रुपयांपर्यंत लाभ जाहीर केला होता. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत दिड लाख रुपये जमा केले. या योजनेतंर्गत जिल्ह्यात चार हजार ५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २८ कोटी ६६ लाख रुपये जमा करण्यात आले.

येथे क्लेीक करा ---‘या’ महापालिकेचे फेरीवाला धोरण कागदावरच ​
अद्याप २३९ कोटींची प्रतिक्षा
यांच्याकडील दिड लाखावर असलेली कर्जाची रकम भरली नसल्याने त्यांना मिळणारे २३९ कोटी ३६ लाख रुपयांचा लाभ मिळणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आगामी काळात संपूर्ण कर्जमाफी होईल, अशी आशा असल्यामुळे ते दिड लाखावरील रकम भरत नसल्याचा उक्तीवाद बॅंकेकडून केला जात आहे.

एक लाख ५४ हजार शेतकऱ्यांना लाभ
जिल्ह्यातील थकीत कर्ज योजना, एकरकम परतफेड योजना, चालूबाकीदार अनुदान योजना तसेच सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातत कर्जाचे पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतकऱ्यांना लाभ या योजनेतंर्गत लाभ देेेेण्यात आलाचे सांगण्यात येत आहे. सर्व योजनेतंर्गत जिल्ह्यात आजअखेर एक लाख ५४ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८४ कोटी ५३ लाख रुपये जमा केले आहेत. तर अद्याप २१ हजार ८२६ शेतकऱ्यांना २३९ लाख ३६ हजार रुपयांची कर्जमाफी देण्याचे शिल्लक असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.

नव्या योजनेत जिल्हा बॅंकेला ६८ कोटींची गरज
उद्धव ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे. यात सार्वजनिक तसेच व्यापारी बॅंकांचे खातेदार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतुया बॅंकांच्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीसाठी किती रक्कमेची आवश्यकता आहे, याची माहिती अद्याप तयार झाली नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नव्या निकषानुसार बॅंकेच्या १९ हजार ४२३ खातेदार कर्जमुक्तीसाठी पात्र ठरतील असा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी बॅंकेला ६७ कोटी ६४ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे बॅंकेच्या उपसरव्यवस्थापकांनी कळविले आहे.

‘शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजाणीचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेच्या समन्वयातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मे अखेर रक्कम जमा करुन लगेच नवीन पिककर्ज देण्यात येणार आहे.
: प्रविण फडणीस
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com