Nanded: देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९८ उमेदवारांचे अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election
देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९८ उमेदवारांचे अर्ज

देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९८ उमेदवारांचे अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर : देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी येत्या ता. १८ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी शेवटच्या ता. २३ डिसेंबर रोजी भरलेल्या १०९ अर्जामधून गुरुवारी (ता. २५) झालेल्या छाननीत दहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर एका उमेदवाराने दोन अर्ज भरल्याने त्यांनी एक अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ९८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. तालुक्यातील ६४ सेवा सहकारी सोसायटीच्या ७७९, ९० ग्रामपंचायतीच्या ७४३, व्यापारी मतदार संघातील २११ तर हमाल मापाडी मतदारसंघातील २७९ असे दोन हजार १२ मतदार या निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत.

मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस होता. त्या दिवशी १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एका उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केल्याने एकूण अर्जाची संख्या १०९ झाली होती. गुरुवार झालेल्या छाननीत दहा अर्ज बाद झाले. दोन भरलेल्या उमेदवाराने एक अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ९८ अर्ज शिल्लक राहिलेले आहेत.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

निवडणुकीच्या रिंगणात सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ४१ अर्ज, महिला मतदारसंघातून आठ, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सहा, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून सहा, ग्रामपंचायत मतदार संघातून ३३, अनुसूचित जाती मतदारसंघातून दोन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून दोन, व्यापारी मतदारसंघातून पाच तर हमाल मापाडी मतदारसंघातून फक्त तीन अर्ज शिल्लक राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री कौरवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश देगलूरकर यांनी दिली.

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून येत्या काही दिवसात त्याबाबत अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे, सध्या तरी ज्या त्या पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून ठेवले आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. नऊ डिसेंबरनंतरच चित्र स्पष्ट तालुक्यातील जवळपास १४ सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक असल्याने अनेक मतदारांना या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

पण पोटनिवडणुकीच्या मतदानामुळे न्यायालयात जाण्यास उशीर झाल्याने देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाला नाही. सहकार प्राधिकरणाने देगलूर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून प्रक्रियेला स्थगिती अद्याप तरी दिलेली नाही. येत्या ता. नऊ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्या नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

loading image
go to top