
नांदेडमध्ये वडिलांनी विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून मारहाण केल्यानंतर विहिरीत फेकून हत्या केली.
तरुणीचे विवाहपूर्व संबंध लग्नानंतरही सुरू असल्याचे कळल्यामुळे ही ऑनर किलिंगची घटना घडली.
पोलिसांनी मुलीचे वडील, काका आणि आजोबा अशा तिघांना अटक केली असून तपास सुरू आहे.
Father kills Daughter : नांदेडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनीच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहित फेकून दिले आहे. यानंतर आरोपी स्वत: पोलिसांत हजर झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील एका तरुणीचा गोळेगाव येथील तरुणाशी गेल्या वर्षी विवाह झाला, मात्र या तरुणीचे गावातील एका तरुणासोबत विवाहपूर्व संबंध होते. पण हे संबंधही लग्नानंतरही सुरु असल्याचे तरुणीच्या वडिलांना समजले. त्यांनी मुलीच्या प्रियकराला वारंवार समज दिली. पण तो ऐकायला तयार नव्हता.