
नांदेड : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात मंजूर झालेल्या हजारो घरकुलांच्या कामांना गती मिळालेली नाही. जिल्ह्यात जवळपास ५० हजार ५१६ लाभार्थींना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून, घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे लाभार्थींमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.