

An eight-year-old girl died and three others were seriously injured in a tractor-bike collision near Malegaon.
esakal
मालेगाव : दुचाकी- ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील गंभीर जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वरा संभाजी नादरे (वय ८, रा. माळवटा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे तिचे नाव आहे. ज्ञानेश्वर मुंजाजी नादरे (२७), अंकिता ज्ञानेश्वर नादरे (२२), संस्कृती संभाजी नादरे (१०) हे गंभीर जखमी झाले आहेत.