esakal | नांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

rly 1

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार मुंबई मुख्यालयाने नांदेड-मुंबई विशेष रेल्वेला परवानगी दिली. ही रेल्वे सोमवारपासून (ता.१२) सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करत ३६९ प्रवासी नांदेडहून मुंबईसह विविध गावाला जाण्यासाठी आरक्षण करुन प्रवासाला निघाले. 

नांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद

sakal_logo
By
राजन मंगरुळकर

नांदेड ः  रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार मुंबई मुख्यालयाने नांदेड-मुंबई विशेष रेल्वेला परवानगी दिली. ही रेल्वे सोमवारपासून (ता.१२) सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करत ३६९ प्रवासी नांदेडहून मुंबईसह विविध गावाला जाण्यासाठी आरक्षण करुन प्रवासाला निघाले. पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद या रेल्वेला मिळाल्याचे नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले.  

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे २२ मार्चपासून देशातील रेल्वे सेवा बंद होती. यानंतर तीन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने हळूहळू देशात वेगवेगळ्या मार्गावर विशेष रेल्वे धावण्यास केंद्रीय रेल्वे बोर्डाने परवानगी दिली. नुकतीच नांदेड-मुंबई विशेष रेल्वेला परवानगी मिळाल्यावर सोमवारी (ता.१२) ही रेल्वे धावली. यामुळे अनेक प्रवाशांची सोय झाली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. स्थानकावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. नांदेडडून सायंकाळी पाचला निघालेली रेल्वे मुंबईला सकाळी साडेपाच वाजता पोहचणार आहे. 

हेही वाचा - Video- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपची परभणीत निदर्शने

मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत
प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वे ११ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

हेही वाचा - Video-नांदेड भाजप महिला आघाडीचा राज्य शासनाविरोधात आक्रोश

या गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे असतील
गाडी संख्या ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूर साहेब नांदेड ही गाडी १२ ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद,  नांदेड मार्गे किनवट  येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी १३ ओंक्टोबरपासून किनवट रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.३५ वाजता पोहोचेल. 


येथे असेल थांबा
ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग येथे थांबेल. 

असे असतील डब्बे 
या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि  आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.

ठळक बाबी
-रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार मुंबई मुख्यालयाने दिली विशेष रेल्वेला परवानगी
-नांदेड-मुंबई-नांदेड विशेष रेल्वे सोमवारपासून (ता.१२) सुरु
-सोशल डिस्टंन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करत ३६९ प्रवासी नांदेडहून बसले 
- नांदेडडून सायंकाळी पाचला निघालेली रेल्वे मुंबईला सकाळी साडेपाच वाजता पोहचणार 

loading image