esakal | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाचे रविवारी उद्‌घाटन

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाचे रविवारी उद्‌घाटन}

प्रगतिशील लेखकसंघ, उद्याचा मराठवाडा आणि मौर्य प्रतिष्ठानच्या विद्यमाने रविवारी (ता. 25) पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलन होत आहे. पारंपरिक साहित्य संमेलनापेक्षा हे विचारसंमेलन वेगळे असून सामाजिक न्याय हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाचे रविवारी उद्‌घाटन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नांदेड - प्रगतिशील लेखकसंघ, उद्याचा मराठवाडा आणि मौर्य प्रतिष्ठानच्या विद्यमाने रविवारी (ता. 25) पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलन होत आहे. पारंपरिक साहित्य संमेलनापेक्षा हे विचारसंमेलन वेगळे असून सामाजिक न्याय हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. समाजाला संविधान साक्षर करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संवैधानिक मूल्ये जनमाणसात रुजविणे आणि बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविणे हा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे.

सकाळी दहा वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे "सामाजिक न्यायात स्वयंसेवी संस्थांची भूमिका : भ्रम आणि वास्तव' या विषयावर बीजभाषण होणार आहे. या वेळी महापौर शैलजा स्वामी यांची प्रमुख उपस्थितीत असेल. प्रगतिशील लेखक संघाचे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका विषद करणार आहेत. दुसऱ्या सत्रात साडेबारा वाजता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे "राज्यघटनेतील सामाजिक न्यायाची संकल्पना' या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी अडीच वाजता प्रा.डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे "महिला, मुले, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय' या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी साडेतीन वाजता ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ व "साम'चे संपादक संजय आवटे यांचे "सामाजिक न्याय आणि माध्यमांची भूमिका' या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत डॉ. भालचंद्र कांगो "शेतकरी, श्रमिक आणि सामाजिक न्याय' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील. सायंकाळी साडेपाच वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.

या वेळी आंबेडकरी आंदोलनाचे अभ्यासक, कार्यकर्ते प्रा. डॉ. बजरंग बिहारी-तिवारी यांचे "सामाजिक न्याय और आंबेडकरवादी आंदोलन' या विषयावर समारोपाचे व्याख्यान होईल. या सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे भूषविणार आहेत. संयोजन समितीच्या वतीने नयन बाराहाते, राम शेवडीकर, फारूख अहेमद, यशपाल भिंगे, डॉ. सुरेश सावंत, सतीश कुलकर्णी, संजीव कुलकर्णी, केशव देशमुख, पी. विठ्ठल, रेवती गव्हाणे, संदीप काळे, रवी सरोदे, डॉ. करुणा जमदाडे, महेंद्र देमगुंडे, राजू सोनसळे, रमेश कदम, प्रदीप सरोदे, विजय गाभणे, गजानन सरोदे यासाठी पुढाकार घेत आहेत.