Nanded: महागाईमुळे घराचे स्वप्न भंगले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home
महागाईमुळे घराचे स्वप्न भंगले

नांदेड : महागाईमुळे घराचे स्वप्न भंगले

नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांतील आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेक उद्योगधंदे, व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. दीड वर्षानंतर त्यातून अद्याप आर्थिक गाडी रुळावर आलेली नाही. तसेच बांधकाम क्षेत्रात लोखंडी सळई, सिमेंटच्या किंमतीत वाढ झाल्याने अनेक सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगले आहे. महागाईच्या वरवंट्याखाली घर बांधकाम साहित्यही महागल्याने सद्यस्थितीत सर्वसामान्यांचे बजेट आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रही मंदावले असून त्याचा परिणाम थेट या क्षेत्रातील व्यावसायीक, ठेकेदार, मजूर, कामगारांवर झाला आहे.

लोखंडी सळई, सिमेंट यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने बांधकाम बजेट कोलमडले आहे. बांधकाम व्यावसायिक व बांधकाम करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्राला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाईपमध्ये वापरात येणारे प्लास्टिक रेसिन्स, इक्स्युलेशन सामान यांच्याही किंमती मागील काही महिन्यांत भरमसाट वाढल्या आहेत. कोरोनामुळे अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांकडील पुरवठ्यातील तूट हे सर्व बाजारांतील विकासकांसाठी आव्हान ठरले आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या कच्च्या मालाच्या संकटामुळे महामारीच्या पहिल्या लाटेने याखेरीज तांबे व अॅल्युमिनियमच्या किंमतीतील वाढीचाही बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्र दुसरी लाट व लाॅकडाउन निर्बंधांचा सामना करीत असतानाच कच्च्या मालाच्या किंमतीतील या वाढीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या महसुलाला ब्रेक लागला आहे.

बांधकाम क्षेत्राला घरघर अनेक प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. परराज्यांतील कामगार स्वगृही परतले आहेत. पुन्हा कामावर येण्यासाठी मजुरी वाढवूनही काही परप्रांतीय परत येत नाहीत. त्यामुळे मजुरांचा तुटवडा भासत आहे. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांना व त्यांच्या हाताखाली रोज मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य मजुरदार वर्गाला बसल्याने त्यांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक गाडी रुळावर यायला दोन ते तीन वर्षे जातील. दोन वर्षांपासून कोरोना संकट घोंगाऊ लागल्याने बांधकाम क्षेत्राला दृष्ट लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

loading image
go to top