नांदेडात दोन गटात तुंबळ हाणामारी 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

करबला परिसरात रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. २५) नोव्हेंबर रोजी परस्पर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बारा जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणारी झाल्याने तिन जण जखमी झाले. या हाणामारीत चाकु, तलवार, फायटर आणि लाकडांचा सर्रास वापर करण्यात आला होता. ही हाणामारी करबला परिसरात रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. २५) नोव्हेंबर रोजी परस्पर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बारा जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

शहराच्या करबला परिसरात दोन गटात जुन्या वादातून तंबळ हाणमारी झाली. या हाणामारीत जुलेखार यांच्या मानेवर जबर दुखापत झाली. तसेच लतीफ याच्या डोक्याला जबर मार लागला. काही जण किरकोळ जखमी झाले. या हाणामारीत मारेकऱ्यांनी तलवार, फायटर, चाकु, लाकडी काठ्या, फावड्याचा दांडा असे हत्यार वापरले. ही घटना इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रदीप काकडे हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. किरकोळ वादातून जर हाणामारी झाल्याने पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी माहिती घेतली. 

हे आहेत पोलिसांचे आरोपी

पोलिसांनी जखमी मोहमद इफ्तेखार गुलाम अहेमद याच्या फिर्यादीवरुन अब्दुल लतीफ मस्जीद (वय ४२), अब्दुल हमीद उर्फ सदाम अब्दुल माजीद (वय २८), शेख शब्बीर शेख बशीर (वय ३३), महमद खलील अब्दुल रहीम (वय ४५), अब्दुल कलीम अब्दुल सत्तार (वय ३५), शेख शमशिर उर्फ जम्मु शेख बशीर (वय २८), महमद जलील अब्दुल रहीम (वय ३५), शेख नवशीर शेख बशीर (वय २७), महमद शोयब अब्दुल खलील (वय २२) आणि शेख शमशीद शेख बशीर (वय ३१) सर्व राहणार सिद्धार्थनगर, करबला यांच्यावर तर मोहम्मद शोएब अब्दुल खलील (वय २१) याच्या फिर्यादीवरुन इफ्तेखार अहेमद गुलाम अहेमद, जुल्फेखार अहेमद महमद गुलाम , विखार अहमद उर्फ आतु गुलाम अहेमद, शेख समीर शेख जलील, शेख जफर शेख जमील, अब्दुल शकील अब्दुल सलाम, अब्दुल अनीस अब्दुल सलाम, अब्दुल शरीफ अब्दुल गफार आणि अब्दुल रईस अब्दुल सलाम सर्व राहणार करबला रोड, नांदेड यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला आणि दंगलीचा व आर्मॲक्टचा गुन्हा इतवारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दत्तात्र्य काळे करीत आहेत. 

    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nandeda, two groups of tumblr