Nanded News: नांदेडमध्ये अट्टल दुचाकी चोर पकडला; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, १० गुन्ह्यांची झाली उकल
Nanded Bike Theft: शहर व जिल्ह्यातील दहा दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड : शहर व जिल्ह्यातील दहा दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी (ता. १) अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.