नर्सी नामदेव येथे परतवारी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Hingoli : नर्सी नामदेव येथे परतवारी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

हिंगोली : तालुक्यातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या व प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्सी नामदेव येथे परत वारी देवशयनी एकादशी निमित्त रविवारी ता.२४ भल्यापहाटे पासून भर पावसात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी चार वाजता मंदिरामध्ये महापूजा करण्यात. पुजेजेसाठी ओमप्रकाश हेडा, भीकुलाल बाहेती, रामनारायण सारडा, पुरुषोत्तम बाहेती, भिकाजी कदम, बळीराम सोळंके, विठ्ठल माने, शिवाजी कऱ्हाळे यांची पूजेसाठी उपस्थिती होती.

यावेळी वारकऱ्या मधून पूजेचा मान असोंदा येथील गणेश पुंजाजी शिंदे यांना मिळाला.

आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या देवशयनी एकादशी परतवारी म्हणून ओळखली जाते. यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. दरम्यान कोरोना काळात ख़ंड पडल्याने यावर्षी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. रविवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असताना देखील भाविकांचा उत्साह होता.

रविवारी मराठवाडा व विदर्भातून अनेक पाई दिंड्या नर्सी मध्ये दाखल झाल्या होत्या. भाविकांचे गर्दी वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात बारीची व्यवस्था करण्यात आली होती.

येथे येणाऱ्या भाविकांना कांताशेठ गुंडेवार यांच्याकडून ८० हजार उपवासाचे लाडू वाटप करण्यात आले. नर्सी संस्थान व प्रशासनाच्या वतीने भक्तांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी यासाठी भिका महाराज किर्तनकार, सुभाष हुले, शाहूराव देशमुख, काशीराम महाराज ईडोळीकर, कांता गवते, बद्री घोंगडे, शंकरराव शिंदे, भारत महाराज तावरे, विठ्ठल वाशिमकर, उत्तमराव देशमुख, भागवत सोळंके यांच्यासह अनेक सेवाभावी मंडळींनी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पुढाकार घेतला.

Web Title: Narsi Namdev Arshan Occasion Of Parthwari Ekadashi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top