Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Imtiaz Jaleel accused in Nida Khan case : फरार संशयिताला ३५ दिवस आश्रय दिल्याचा पोलिसांचा संशय; नगरसेवकाचे ऑडिओ रेकॉर्डिंग अन् व्हॉइस सॅम्पल, संजय शिरसाट आक्रमक!
Imtiaz Jaleel accused in Nida Khan case

Imtiaz Jaleel accused in Nida Khan case

Sakal

Updated on: 

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीतील (TCS) कथित लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि धर्मांतराच्या गंभीर प्रकरणाला आता एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य फरार संशयित आरोपी निदा खान हिला महिनाभरापेक्षा जास्त काळ बेकायदेशीररीत्या आश्रय दिल्याचा ठपका ठेवत, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना या गुन्ह्यात अधिकृतपणे आरोपी केले आहे.

Loading content, please wait...