झेडपीचे शिक्षक उमेश खोसेंना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सकाळ
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना (Teacher Umesh Khose) केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार (National Best Teachers Award) जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (Union Education Ministry) वतीने देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील श्री. खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची (Education) अंमलबजावणी,  ज्या तांड्यावर साधी मोबाईलला रेंज नव्हती अशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिकत यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी ५१ ऑफलाईन अॅप्सची निर्मिती केली आहे. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात श्री. खोसे यांचा सिंहाचा वाटा आहे. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बंजारा बोली भाषेतील पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले.

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
औरंगाबादेतील वाढत्या गुंडगिरीवर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपर सादरीकरण केले आहे, त्यांचे पाच पुस्तके व ४७ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्र शासनाच्या अॅपवर ई-कंटेंट तयार केले आहेत. त्यांनी व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून  लोकवट्यातून शाळा डिजिटल केल्या. टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अॅप्स, गेम्स, टेस्ट तयार केलेल्या आहेत.

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
परभणी पालिकेसह जिल्हा परिषदेवरही भगवा, खासदार जाधवांना विश्वास

कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अॅप तसेच इतर साधनाच्या साहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. अशा काळात त्यांनी शाळेची स्वतः ची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला. आयएसओ, उपक्रमशील, अॅक्टिव्ह स्कुल असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोरे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, विरोधी पक्षनेते शरण पाटील, कडदोऱ्याचे सरपंच सुनंदा रणखांब आदींनी श्री. खोसे यांचे अभिनंदन केले आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
'...पण मला कदाचित जगता आलं नाही', फेसबुक पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

दुसऱ्यांदा मिळाला बहुमान !

स्वांतत्र्यपूर्व काळात शिक्षणाची सोय सुरू केलेल्या उमरगा तालुक्यात निकोप शैक्षणिक वातावरण आहे. तालुक्यातून राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्याही मोठी आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाबुराव कांबळे यांना १९९१-९२ या वर्षात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आता माटेफळ ( ता. जि. लातूर) येथील रहिवाशी व गेल्या पंधरा वर्षापासून उमरगा तालुक्यात कार्यरत असलेले श्री. खोसे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com