Ajinkya Paul and Ashwini Mohite Paul
sakal
- अविनाश काळे
उमरगा - शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवणारी उमरगा (जि. धाराशिव) तालुक्यातील व्हंताळ येथील राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू अश्विनी तानाजी मोहिते (विवाहानंतरचे नाव: अश्विनी मनोहर पौळ) हिने गुरुवारी (ता. तीन) नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील किल्ले उपळी बुरूजावरून उडी मारून जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.