तुळजापूर - मंगलमय वातावरणात तुळजाभवानी मातेची घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मूर्ती सोमवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजा झाल्या..सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक, सिंहासन पुजा पार पडल्या. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मातेचे दश॔न जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक सोमयाश्री पुजार यांच्या समवेत घेतले. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडापासून जलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली..त्यानंतर तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यात घटस्थापना झाली. त्यानंतर येमाई मंदिरात आणि मल्हारीम्हाळसाकांत मंदिरात ही घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेचे सर्व धार्मिक विधी, अंगारा मिरवणूक तुळजाभवानीचे भोपे पुजारी विनोद सोंजी-कदम यांनी केले.त्यानंतर तुळजाभवानी मंदिरातील भवानीशंकर मंडपात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक सोमयाश्री पुजार यांच्यासमवेत ब्राम्हणांना वर्णी दिली. तसेच येत्या ता.30 सप्टेंबरला होणार्या दुर्गाष्टमी होमाची वर्णी ब्राम्हणांना दिली. तसेच यावेळी गणेशपुजन, वरूणपुजन, कलशपुजन, पुण्याहवाचन आदी धार्मिक विधी पार पडले..तसेच कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिक प्रयाग आणि त्यांच्या पत्नी अंजली प्रयाग तर हैदराबादच्या राजारावबहाद्दूर धर्मवंत धर्मकण॔ संस्थानच्या वतीने पुरंजन कोंडो आणि त्यांच्या पत्नी कांचन कोंडो यांना ब्राम्हणांना वर्णी दिली.यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अच॔ना पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तुळजाभवानी मंदिराच्या सरव्यवस्थापिका माया माने, महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, नागेश साळुंके, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर-कदम, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, गिरीश देवळालकर आदी उपस्थित होते..तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सरकारी उपाध्ये सुनित उर्फ बंडोपंत पाठक, ऋषिकेश दादेगांवकर-धनेश्वर, महेश प्रयाग, राजन पाठक, अनंताचाय॔ कांबळे, राजेश नंदीबुवा, रवी पाठक यासह अनेक ब्राम्हणांनी वेदपठण केले.तसेच यावेळी तुळजाभवानी मातेच्या घटाचे मानकरी संजय घटे, अजय घटे यांच्यासह अनेक ब्राम्हणांना मंदिराच्या वतीने निमंत्रित करून वर्णी देण्यात आली. तुळजासहस्त्रनाम, भवानीसहस्त्रनाम, दुर्गासप्तशती, भवानीशंकर अभिषेक, नवग्रह जप आदी धार्मिकविधी मंदिरात होणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.