लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

राजेश दारव्हेकर
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

म्हाळशी (ता. हिंगोली) येथे बाळू व अश्वीनीचा विवाह सोहळा सोशल डिस्टन्सिंगमुळे फक्त तीघांच्याच उपस्‍थिती पार पडला. दरम्यान वाहन नसल्याने चक्क नवरदेवाने नवरीला आपल्या दुचाकीवरून घरी आणले.

हिंगोली :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यसाठी लॉकडाऊन असल्याने यापुर्वी विवाह ठरलेल्या तारखा जवळ येत असल्याने वधु वरांसह वऱ्हाडी मंडळीची धाकधूक सुरू आहे. मात्र मे महिण्याच्या तीन तारखेपर्यंत लॉकडाऊनचा कालाधवी वाढवल्याने अगोदरच्या लग्नाच्या सर्वच तारखा आता रद्द करण्याची वेळ आली आहे. मात्र, त्‍यातून काही जण वेगळा पर्याय काढत लग्न उरकून घेत आहेत.   

सेनगाव तालुक्‍यातील आजेगाव येथील कैलास चाटसे यांचा मुलगा बाळू तर हिंगोली तालुक्‍यातील म्‍हाळशी येथील लक्ष्मण भुक्‍तर यांची मुलगी आश्वीनी यांचा विवाह गुरूवारी (ता.१६) ठरलेला होता.  मात्र लॉकडाऊनमुळे वऱ्हाडी मंडळी जमविण्यास बंदी असल्याने नवरदेवासह त्‍याच्या कुटूंबीयांनी वधू व त्‍यांच्या कुटूंबीयांना लग्न त्‍याच दिवशी करण्याचा सल्‍ला दिला. परंतु,  या लग्नास कोणीच येणार नाही. वधु-वर व लग्न लावणारी व्यक्‍ती अशा तिघांच्या उपस्थितीतच लग्न लावून देण्याचे ठरले. त्‍यानुसार गुरूवारी नवरदेव बाळू व वधू अश्वीनी यांचा अगदी साध्या पध्दतीने विवाह पार पडला.

हेही वाचा - हिंगोलीत पाच रेशन दुकानदारांवर कारवाई

वधू-वरांची झाली मोठी अडचण
विशेष म्हणजे खबरदारी म्हणून अश्‍विनी व बाळी यांनी मास्क लावला होता. लग्न झाल्यावर दोघांनी दुचाकीवरूनच आजेगाव गाठले. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. लग्न म्हटलं की दोन ते तीन महिन्यांपासून सर्व तयारी असते. यात वधू वराचे कपडे, लग्नात देण्यात येणारी संसारोपयोगी साहित्याची खरेदी, पत्रिका तयार करून त्या वाटप करणे, किराणा सामान, इलेक्‍ट्रीक वस्‍तू, रुखवत आदी साहित्यांची खरेदी अशी जय्यत तयारी असते. त्‍यानंतर वधूच्या सजावटीसाठी ब्यूटी पार्लरमध्ये जावून चेहरा फेस करणे, हातावर मेंहदी काढणे, आदी कामे करण्यात घरातील सर्वजण मग्न असतात.  मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या वर्षी सर्व नियोजन बिघडलं आहे. त्यामुळे वधु-वरांची मोठी अडचणी झाली आहे. 

हे देखील वाचाच - कळमनुरीत स्वस्तधान्य दुकानदार चौकशीच्या फेऱ्यात

घरातच टाकल्या पुष्पमाळा
बाळू व अश्वीनी यांनी काढलेला हा पर्याय फारच आगळा वेगळा ठरला.  वधू-वरांसाठी सजावटीच वाहन नको,  ना वऱ्हाडी मंडळीसाठी लागणारे वाहने. तसेच मानपान आदी गोष्टींना फाटा देत एकदम साध्या पध्दतीचा हा विवाह झाला. घरामध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर वंदना घेऊन या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे दोघांनीही मास्क लावूनच एक-मेकांच्या गळ्यात पुष्पहार टाकले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navrdev Brought the Wife Home by Bike Hingoli News