Naygaon taluka’s Gram Panchayat reservation crosses the 50% limit, raising concerns over OBC quota
नायगाव : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे आदेश दिले असल्याने निवडणुकावर टांगती तलवार आहे. मात्र नवीन वर्षात तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जुलै महिन्यात आरक्षणाची सोडत झाली परंतु या आरक्षणातही ५० टक्केची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचे काय होणार असा प्रश्न गाव पुढाऱ्यांना पडला आहे. मागच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरु झाली आहे.