

Opposition Within NCP MLA Says Dhananjay Munde Better Restricted to Parli
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी राजकीय समीकरण सध्या तयार होतायत. कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी हातमिळवणी करून निवडणुकीच्या रिंगणात नेते उतरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी मंत्री धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून नेमलं आहे. पण त्यांच्या नेमणुकीला पक्षाच्याच आमदारानं विरोध केलाय. धनंजय मुंडे परळीतच बरे, ते स्टार प्रचारक म्हणून नकोत अशी मागणी आमदारानं पक्षाकडं केलीय.