esakal | मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोराचा फोटो : डॉ. कोल्हे
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोराचा फोटो : डॉ. कोल्हे

दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. महिनाभरात मराठवाड्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोराचा फोटो : डॉ. कोल्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. महिनाभरात मराठवाड्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मराठवाड्यात जाणार, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पारदर्शकतेचा गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोरीत तीन महिने कोठडीत राहणाऱ्यांचे फोटो कसे, असा सवालही डॉ. कोल्हे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सभा रविवारी (ता. २५) रात्री बीडमध्ये झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.

अमोल कोल्हे म्हणाले, विनयभंग, बलात्कार, खून आदी घटनांची वाढती आकडेवारी सांगत गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांचा असाच कारभार का, असा सवाल करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, का असा सवाल केला. शरद पवारांच्या आशीर्वादाने पदे, अधिकार मिळविणारे या परिस्थितीत त्यांच्याकडे पाठ फिरवून गेले. मात्र, जनता त्यांच्याकडे पाठ फिरवणार असल्याचेही कोल्हे म्हणाले.

आगामी निवडणुकीत त्यांनी ३७० कलमाचे मेसेज पाठविले तर त्यांना कर्जमाफीचे काय, असा रिप्लाय पाठवा, जवानांच्या शौर्याचे मेसेज पाठविले तर तरुणांच्या बेरोजगारीचे काय, असा रिप्लाय पाठवा असेही अमोल कोल्हे म्हणाले.

loading image
go to top