Suraj Chavan: सूरज चव्हाण पोलिसांना शरण; ‘छावा’चे घाडगे यांना मारहाण प्रकरण, नऊ जणांची अटकेनंतर सुटका
Suraj Chavan Arrested : दिल्लीतील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती.
लातूर : येथील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना रविवारी (ता. २०) झालेल्या मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण बुधवारी (ता. २३) विवेकानंद ठाण्याच्या पोलिसांना शरण आले.