esakal | परभणीत पाटबंधारे मंडळ किंवा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज- अभिजित धानोरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नेहमीच कोरडा दुष्काळ सहन करणार्‍या मराठवाड्यामध्ये रब्बी व उन्हाळी पिकांसाठी 100 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. जायकवाडी प्रकल्पाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे 84 हजार 400 हेक्टर क्षेत्र, माजलगाव प्रकल्पाचे 54 हजार हेक्टर, तर निम्न दुधना प्रकल्पाचे 44 हजार हेक्टर क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे

परभणीत पाटबंधारे मंडळ किंवा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज- अभिजित धानोरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः लघू व मध्यम प्रकल्प तसेच गोदावरी नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे मोठी लाभक्षेत्र सिंचन क्षमता असलेल्या जिल्ह्यासाठी परभणी पाटबंधारे मंडळ, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाचे कार्यालय सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

नेहमीच कोरडा दुष्काळ सहन करणार्‍या मराठवाड्यामध्ये रब्बी व उन्हाळी पिकांसाठी 100 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. जायकवाडी प्रकल्पाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे 84 हजार 400 हेक्टर क्षेत्र, माजलगाव प्रकल्पाचे 54 हजार हेक्टर, तर निम्न दुधना प्रकल्पाचे 44 हजार हेक्टर क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. यावर्षी गोदावरी नदीवरील बंधारे पूर्णतः भरले आहेत. त्यावरील लाभक्षेत्र 11 हजार 500 हेक्टर असून लघू व मध्य प्रकल्पामुळे  13 हजार 278 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होते. यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता उपलब्ध आहे. मात्र, हे सर्व जलसाठे इतर जिल्ह्यात आहे. तर लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. निम्न दुधनाचे बांधकामासाठी बीड कार्यालयाकडे काम सोपविण्यात आले आहे. तर व्यवस्थापन मात्र औरंगाबाद कडा ऑफीसकडे देण्यात आले आहे. आणि लाभक्षेत्र मात्र परभणी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. लघू व मध्यम प्रकल्प तसेच गोदावरीवरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे एवढ्यामोठ्या लाभक्षेत्र सिंचन क्षमता असलेल्या जिल्ह्यासाठी परभणी पाटबंधारे मंडळ, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाचे कार्यालय निर्माण केल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

हेही वाचाचंद्र आहे साक्षीला : कोजागिरी पौर्णिमा आरोग्यासाठी आहे फलदायी -

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रंचड तुटवडा

यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने जिल्हयातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.परंतू हिवाळ्यातील शेवटचे दिवस व संपूर्ण उन्हाळा या जिल्ह्यात पाण्याची भिषण टंचाई जाणवत असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे पडल्यास पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवण्यास सुरुवात होते. परिणामी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रंचड तुटवडा जाणवतो. याचा विपरित परिणाम शेतमालाच्या उत्पदनावर होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या मोठ्या लाभ क्षेत्राचा विचार करून जिल्ह्यासाठी परभणी पाटबंधारे मंडळ, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाचे कार्यालय सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

निम्नदुधना प्रकल्पाचे मोठे लाभक्षेत्र

औरंगाबाद प्रकल्प मंडळ बंद करून लातूर येथे लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाचे कार्यालय सुरू करण्यात आले. परभणी जिल्ह्यात जायकवाड, माजलगाव, निम्नदुधना प्रकल्पाचे मोठे लाभक्षेत्र असल्यामुळे या कार्यालसयास मान्यता द्यावी. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

- अभिजित जोशी, अध्यक्ष, भगीरथ पाणी परिषद.

संपादन- प्रल्हाद कांबळे