ashok chavan
sakal
देगलूर - नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याला काहीही मिळालेले नाही, मिळणारही नाही, भुलथापांना बळी पडुन चुकीच्या लोकांच्या पाठीशी आपण उभे राहणार का...? असा सवाल उपस्थितांना करून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देश नरेंद्र, राज्य देवेंद्र, व जिल्हा भाजपाच्या हातात दिल्यास विकासाचे स्वप्न पूर्ण करता येईल. यासाठी सत्तेची सूत्रे आमच्याकडे सोपवा, अशोक चव्हाण विकासाची गॅरंटी घ्यायला सक्षम असल्याचे ते म्हणाले.