esakal | हुश्‍श...! परभणीतील ‘त्या’ नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

बोलून बातमी शोधा

File photo

पुण्याहून एक युवक दुचाकीवर गावी जात होता. दरम्यान, त्याला त्रास होऊ लागल्याने परभणी येथील बहिणीच्या घरी थांबला. त्याच्या मेहुण्याने त्याला जिल्हा रुग्णालयात भरती केले असता, त्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले.

हुश्‍श...! परभणीतील ‘त्या’ नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी शहरात सापडलेल्या ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने परभणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

परभणी शहरात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या भागात गुरुवारी २१ वर्षीय तरुण कोरोना विषाणू संक्रमित आढळून आला होता. हा तरुण पुणे येथून हिंगोली जिल्ह्यातील त्याच्या गावी आला होता. त्याची तब्येत बरोबर नसल्याने तो परभणी येथे मोटरसायकलद्वारे त्याच्या बहिणीकडे आला. तेव्हा त्याला त्याच्या मेहुण्याने जिल्हा रुग्णालयात भरती केले. त्याची तपासणी केल्यानंतर तसेच स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने परभणी जिल्हा हादरून गेला.

हेही वाचा - संचारबंदी कडक, घराबाहेर पडू नका, कुठे ते वाचा...

दरम्यान त्याच्या संपर्कात आल्याने त्याच्या बहिणीच्या घरातील पाच सदस्य व त्याच्या संपर्कात आलेले अन्य तिघांना जिल्हा रुग्णालयात कॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचा चाचणी अहवाल शनिवारी (ता. १८ एप्रिल २०२०) सकाळी प्राप्त झाला असून,  हे नऊही जण निगेटीव्ह असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

येथे क्लिक करा - नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली

कोरोना बाधित युवकाची बहीण शहरातील अनेक घरात घर कामासाठी जात होती. त्यामुळे परभणीकरांमध्ये घबराटीचे वातावरण होते. याशिवाय इतर ४९ व्यक्तींची तपासणी देखील करून त्यांचे स्वब घेण्यात आले होते. त्यातील ४३ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नगरगोजे यांनी दिली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सध्यातरी परभणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.