Latur News : सीएनजी सिलिंडर तपासणीकडे दुर्लक्ष ; फिटिंग करणाऱ्या ‘रेट्रोफिटर्स’चा सुळसुळाट

पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या वाढत्या किमतीमुळे ‘सीएनजी’वाहने चालविण्याकडे कल वाढला आहे. वाहन कंपन्याही सीएनजी सिलिंडर फिट करून गाड्या काढत आहेत, तर अनेक वाहनधारक खासगीरीत्या सिलिंडर बसवून वाहने चालवीत आहेत.
Latur News
Latur Newssakal

लातूर : पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या वाढत्या किमतीमुळे ‘सीएनजी’वाहने चालविण्याकडे कल वाढला आहे. वाहन कंपन्याही सीएनजी सिलिंडर फिट करून गाड्या काढत आहेत, तर अनेक वाहनधारक खासगीरीत्या सिलिंडर बसवून वाहने चालवीत आहेत. पण, असे सिलिंडर दर तीन वर्षांनी एकदा अधिकृत केंद्राकडून तपासणी करून घेतले पाहिजे. ती न करताच अनेक गाड्या धावत आहेत. मराठवाड्यात असे सीएनजी सिलिंडर फिटिंग करणाऱ्या रेट्रोफिटर्सचा सुळसुळाट झाला आहे. प्रमाणपत्राशिवाय सिलिंडर फिटिंग करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. हे धोकादायक असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

सीएनजी इंधन स्वस्त आहे, म्हणून वाहनधारक त्याचा वापर करताना दिसत आहेत. सीएनजी सिलिंडरमध्ये २०० पीएसआय एवढ्या प्रेशरने गॅस भरावा लागतो. या दाबाने गॅस भरल्यानंतर सिलिंडर प्रसरण व गॅस संपल्यास आकुंचन पावतो. गॅस भरताना सिलिंडर गरमही होतो. यामुळे सिलिंडरच्या भौतिक स्वरूपात खूप बदल होतो. हे सिलिंडर चालविण्यास योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी दर तीन वर्षांनी करून घेणे बंधनकारक आहे. ही हायड्रोटेस्टिंगची तपासणी असते.

अशी आहे तपासणी पद्धत

सिलिंडरची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एखादे अधिकृत केंद्र आहे. या केंद्राला ‘पेट्रोलियम अॅण्ड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’ या संस्थेची मान्यता दिली जाते. तेथे तपासणी केल्यानंतर सीएनजी वाहनाचा केंद्राच्या कर्मचाऱ्याबरोबर छायाचित्र काढले जाते. दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर ते जोडले जाते. अशा ठिकाणी डिगॅसिंग आवारामध्ये सिलिंडरमधील गॅस बाहेर सोडला जातो. त्यानंतर सिलिंडरची हायड्रोटेस्टिंग केली जाते. त्यानंतरच ते वाहनात बसविले जाते. त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. पण, सध्या मराठवाड्यात रेट्रोफिटर्सचा सुळसुळाट झाला आहे.

Latur News
Samruddhi Mahamarg : सक्तीच्या समुपदेशनामध्ये भावनिक साद ; समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांचा वर्ग

पुणे, मुंबईच्या केंद्रांशी संगनमत

रेट्रोफिटरकडून कोणत्या प्रकारची तपासणी न करताच सिलिंडर फिटिंग करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. गॅस भरण्यास सिलिंडर योग्य आहे किंवा नाही, याचे प्रमाणपत्र नसतानाच अनेक वाहने रस्त्यावर धावत आहेत. अनेक ठिकाणी रेट्रोफिटर्सनी भरवस्तीत टपऱ्यांसारखी दुकाने टाकली आहेत. तेथेच सिलिंडरमधील गॅस बाहेर सोडण्याचे प्रकार वाढले असून, ते धोकादायक आहेत; तसेच हे रेट्रोफिटर पुणे, मुंबई येथील अधिकृत केंद्रांच्या संगनमताने असे सिलिंडर बसवून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे उद्योगही करीत आहेत. याकडेही दुर्लक्ष होत आहे.

‘फ्युएल फिलिंग प्लेटही बनावट

अधिकृत केंद्राकडून सिलिंडरची तपासणी केल्यानंतर संबंधित केंद्राकडून वाहनाला फ्युएल फिलिंग प्लेट लावली जाते. या प्लेटवर केंद्राचे नाव, सिलिंडर क्रमांक, वाहन क्रमांक, त्याची वैधता असा मजकूर असतो. पण, सध्या केंद्राचे नाव नसलेल्या बनावट प्लेट वाहनाला बसविण्याचा उद्योगही रेट्रोफिटर्सकडून केला जात आहे.

कंपनी फिटेड किंवा खासगीरीत्या सीएनजी सिलिंडर वाहनात बसवलेले असले, तरी दर तीन वर्षांनी सिलिंडर किटची हायड्रोटेस्टिंग करून घेणे वाहनधारकांना बंधनकारक आहे. वाहन टॅक्सी असेल तर दर दोन वर्षांनी तपासणी करणे गरजेचे आहे. आरटीओकडे प्रमाणित असलेल्या अधिकृत केंद्रावरूनच ही तपासणी करून घेतली पाहिजे. सिलिंडर बसवले आणि अधिकृत प्रमाणपत्र नसेल, तर वाहन धोकादायक पद्धतीने चालवणे, वाहनाचा फिटनेस नसणे अशा विविध कलमांखाली वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

- आशुतोष बारकुल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com