निष्काळजीपणा  : जवानाच्या एकत्रितपणामुळे हिंगोलीत पॉझीटीव्ह वाढतायेत

राजेश दारव्हेकर
Saturday, 2 May 2020

एका जवान कोरोना पॉझीटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकाच दिवसात 26 रुग्ण वाढल्याने जिल्‍हाभरात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधान देखील येत आहेत. 

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता.1) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात परत एका जवान कोरोना पॉझीटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकाच दिवसात 26 रुग्ण वाढल्याने जिल्‍हाभरात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधान देखील येत आहेत. 

मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्‍तावरून रविवारी (ता.19) व  सोमवार (ता.20) हिंगोली येथील राज्य राखीव दलाताल 194 जवान व अधिकारी जिल्‍ह्‍यात परत आले होते. सामान्य रुग्णालयात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात 25 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची बांधा झाल्याचे निष्पण झाले. सायंकाळी परत एक जवान बाधीत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले. 

जिल्‍ह्‍यात कोरोना बाधीतांची संख्या 47 झाली

त्‍यामुळे आता जिल्‍ह्‍यात कोरोना बाधीतांची संख्या 47 झाली आहे. या पैकी एका रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आलेला आहे. येथे पॉझीटीव्ह आलेल्या 47 रुग्णात 42 एसआरपीएफचे जवान आहेत. तर एक जालना येथील एसआरपीएफचा जवान आहे. त्‍याच्या संपर्कातील दोन तर वसमत व सेनगाव येथील प्रत्‍येकी एक जण आहे. हिंगोलीच्या चार जवानांना मधुमेह, च्चरक्‍तदाबचा त्रास असून त्‍याना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

हेही वाचा - Nanded Breaking : गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील २० कर्मचारी पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २६

कोरोना बाधीत व इतर जवाना एकत्र आले

दरम्‍यान, हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान कर्तव्यावरून परत आल्यावर त्‍यांना जिल्‍हा प्राशासन व एसआरपी प्रशासनाने क्‍वांरटाईन केले या सर्व जवानांना तीन खोल्यात चार ते पाच जनांना ठेवले होते. यामुळे यात कोरोना बाधीत व इतर जवाना एकत्र आले त्‍यांच्या वापरासाठी असलेल्या स्‍वच्‍छतागृहाचा व बांथरूचा एकत्रीत वापर झाला नास्‍ता व जेवण देखील एकत्रीत सुरू होते. या जवानांनाच कोण बाधीत आहेत याची खबर देखील लागली नसल्याचे चर्चा आहे. त्‍यामुळे सर्वजन एकत्रित राहत होते. 

प्रशासनाचा निष्काळजीपण समोर येत असल्याचे दिसुन येत आहे

याचा परिणाम रुग्ण वाढीवर होत आहे येथे क्‍वांरटाईन असलेल्या जवानाना आरोग्य सेवा देखील तितकी मिळत नसल्याची चर्चा आहे. एकदा गोळ्या दिल्या जात आहेत. एका ठिकाणी राहून हे जवान देखील कंटाळले आहेत. येथे त्यांना मिळणाऱ्या सुविधा देखील योग्य मिळत नसल्याचे जवान सांगत आहेत. आम्‍हाला ॲडमीट तर करा म्‍हणजे आरोग्य सुविधा मिळेल अशी चर्चा आहे. आता दररोज या जवानाचा वाढत चालेला आकडा जवानांच्या चिंता वाढत आहे. यामुळे येथे या जवानासाठी असणाऱ्या सुविधा 
चांगल्या पुरविणे गरजेचे झाले आहे. या जवानांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सर्वत्र पसरत असल्याने प्रशासनाचा निष्काळजीपण समोर येत असल्याचे दिसुन येत आहेत. 

एका जवानाने केलेली कविता. 

ऱ्हदयात लागली आग, आता भवानाही पेटल्या. जळूद्या बंधने गुलामीचे झळा कित्येक सोसल्या. वर्दीच्या बंधनात जघडली, इथे भावनाची कदर नाही देशसेवा केली प्रामाणिकतेने आमचा कुणालाच आदर नाही जनतेच्या रक्षणासाठीच आम्‍ही स्‍वतःला जळताना पाहतोय कोरोनाच्या महालढ्यात आमच जीवनच अर्पण करतोय

काही बिनडोक लोकांना समजावताना आम्‍हीच कोरोनाचे बळी ठरतोय हाऊस कोणाला घर सोडून ड्यूटीची आम्‍ही नेहमीच देशासाठी मरतोय का आणी कुणासाठी लढतोय याची जाणीव कोणालाच नाय 
कौतुकाचे शब्द तर दूरच पण वरिष्ठांनी सांत्‍वनही केले नाही ड्युटीच करून घेता येते त्‍यांना दुखात वरायला जमत नाही अधिकांराचा चढवला अलंकार सुखाचे सौदर्य कुठेच दिसत नाही कोरोनोच रिपोर्ट पॉझीटीव्ह आले जसे आम्‍ही गुन्हेगारच ठरलो आम्‍ही मानिसिकतेन विरलोद्या जराशी हाक आम्‍हा 
आपले पणाची साथ द्या कोरोनाशी पुन्हा लढण्यास प्रेमेळ शुभेच्‍छाची दाद द्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negligence: Due to the unity of the jawans, positives increase in Hingoli