उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ नवीन कोरोना रुग्णांची भर

तानाजी जाधवर
Saturday, 31 October 2020

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.३१) ४५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.३१) ४५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सुदैवाने जिल्ह्यात दिवसभरामध्ये मृत्युची एकही नोंद नाही. तर बरे होऊन ४० रुग्ण घरी गेले आहेत. आतापर्यंत १३ हजार ३७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.८१ टक्के इतके झाले आहे.
जिल्ह्यातील १७१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

त्यातील २७ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. तर ३११ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील १८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अशा ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद आठ, तुळजापुर दोन, लोहारा शून्य, कळंब आठ, वाशी १२, भूम चार, परंडा एक अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १४७२६
बरे झालेले रुग्ण- १३३७२
उपचाराखालील रुग्ण- ८२७
एकुण मृत्यु - ५२७
आजचे बाधित - ४५
आजचे मृत्यु - शुन्य

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 45 Corona Cases Recorded In Osmanabad District