अरे देवा...जनावरांनाही नवीन आजार, बीड जिल्ह्यातील पशुपालक धास्तावले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परळी वैजनाथ (जि. बीड) - तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसापासून गाई-बैलांमध्ये नेहमीपेक्षा वेगळा व गूढ असा आजार झाल्याचे आढळून येत आहे. गुरांना आजाराची लागण झाल्याने पशुपालक धास्तावले आहेत. यामध्ये जनावरांच्या अंगात ताप, अंगावर गाठी व गळ्याला सूज असून चारापाणी न घेणे ही लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत.

पशुवैद्यकीय टीम यावर लक्ष ठेवून उपचार करत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन  प्रशासनाने केले आहे. दोन दिवसापासून परळी तालुक्यातील काही गावातील गुरे चारा खात नसल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. या संख्येमध्ये सारखी भर पडल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे गुरांमध्ये आढळून येत असलेला हा आजार संसर्गजन्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पशुवैद्यकीय तपासणीसाठी ही जनावरे नेली असता हे व्हायरल इन्फेक्शन असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. या गुरांवर उपचार करण्यात आले आहेत तसेच या आजाराने बाधित असलेल्या गुरांचे नमुने पशुवैद्यकीय विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रथम दर्शनी या गुरांमध्ये आपल्याकडे नेहमी न आढळणारा आजार असल्याचे लक्षात येत असून आजाराला लिंपीस्किन व्हायरल इन्फेक्शन असे म्हणतात असे वैद्यकीय सूत्रांचे सांगितले. दरम्यान, तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे अशा प्रकारच्या आजाराची लागण झालेली २० ते २५ गुरे  आढळून आली आहेत. या ठिकाणी पशुवैद्यकीय पथक या गुरांवर उपचार करत आहे.

पशुवैद्यकीय विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुरांवर पशुवैद्यकीय उपचार तातडीने सुरू करण्यात आले असून अशाप्रकारची लागण असलेली गुरे आढळल्यास  इतर गुरांपासून बाधित गुरांना दूर ठेवावे तसेच हा ज्वर आजार असून यामध्ये घाबरून जाण्यासारखे काही नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वैद्यकीय उपचार तातडीने व तत्परतेने करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एल. आघाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com