esakal | coronavirus - देश लॉकडाऊन न करताही स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी.. 
sakal

बोलून बातमी शोधा

नीलेश निर्मळ कुटुंबासोबत, झेक प्रजासत्ताक 

पोलंड, स्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया व जर्मनी या देशांच्या मधोमध वसलेला झेक प्रजासत्ताक (czechia) हा युरोपातील छोटासा देश. एक कोटीहून अधिक लोकसंख्येचा हा देश भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्यापेक्षा थोडा मोठा आहे; मात्र देशात सध्या साडेपाच हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, ११३ जणांचा मृत्यू झालाय. मध्य युरोपातील हा इवलासा देश स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढतोय. त्यामुळे या देशाला लॉकडाऊन करण्याची गरज पडली नाही. याबाबत तेथील रहिवासी नीलेश निर्मळ यांच्याशी ‘सकाळ'ने साधलेला संवाद. 

coronavirus - देश लॉकडाऊन न करताही स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी.. 

sakal_logo
By
योगेश सारंगधर, औरंगाबाद

आज युरोपीय देशांना कोव्हीड १९ विषाणूने विळख्यात घेतले आहे. अतिशय श्रीमंत असणाऱ्या देशांमध्ये आरोग्य यंत्रणाही प्रचंड सक्षम आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात हे देश हतबल झाले आहेत. मध्य युरापोताली झेक प्रजासत्ताक हा देशही कोरोनाशी स्वयंशिस्तने लढत आहे. सकारात्मक वृत्ती ठेवून सरकारच्या नियमांचे पालन करणाऱ्या या देशातील नागरिकांची देशभक्तीही यानिमित्त दिसून येत आहे. मास्कचा तुटवडा जाणवू नये म्हणून झेक प्रजासत्ताक देशातील महिला घरातच मास्क तयार करून रुग्णालय व आरोग्य सेवेशी संवंधित कर्मचाऱ्यांना पाठवत आहेत. यासंदर्भात नीलेश निर्मळ यांच्याशी झालेली बातचीत...

प्रश्न : युरोपीय देशांचे सरकार आणि नागरिक कुठे चुकले? 
नीलेश निर्मळ : बहुतेक सर्व युरोपीय देशांमध्ये चांगली वैद्यकीय व्यवस्था आहे; पण संसर्गाच्या सुरवातीच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी होईपर्यंत संबंधिताला शोधणे आणि वेगळे करणे कठीण आहे. मोठ्या संख्येने उद्रेक होण्यापूर्वी युरोपातील काही देशांनी त्यांचे नियंत्रण गमावले. त्यामुळे आज जगात सर्वाधिक रुग्ण युरोपात असून मृत्यूही होत आहेत. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

प्रश्न : तुमच्यासह देशवासीय कशी काळजी घेताहेत? 
नीलेश निर्मळ : मी पत्नी व दोन मुलांसह राहतो. मी अभियांत्रिकीत पदवी घेतली असून, या देशात आठ वर्षांपासून राहत आहे. सध्या एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. कोरोनाच्या संकटामुळे दिवसाचा बहुतेक वेळ आम्ही घरातच असतो. दिवसातून एकदा आम्ही बाहेर जेथे गर्दी नसेल, तेथे थोडा वेळासाठी जातो. घरी आल्यावर आम्ही सर्वजण साबण, सॅनिटायझरने हात धुतो. बाहेर वापरलेले सर्व कपडेही धुतले जातात. सरकारने घराबाहेर गेल्यास प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. 

प्रश्न : देशात लॉकडाऊन आहे का? 
नीलेश निर्मळ : सरकारने देश लॉकडाऊन केला नाही; पण जमावास परवानगी नाही. मास्कशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. मुळात नागरिकच खूप जबाबदारीने वागताहेत. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केलेय जातेय. येथील बहुतेक महिला घरातच मास्क तयार करून रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना पुरवीत आहेत. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

प्रश्न : भारताची काळजी वाटते का? 
नीलेश निर्मळ : भारत सरकार योग्य पावले उचलत आहे; पण दाट लोकसंख्येमुळे काही गोष्टी पाळणे कठीण आहे. लॉकडाऊन प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी; परंतु काही लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. आधीच आर्थिक मंदी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूने सर्व व्यवसाय प्रभावित झाले आहेत. छोट्या आणि मध्यम उद्योगांना संघर्ष करावा लागेल. पर्यटन आणि प्रवासावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर जास्त काळ परिणाम जाणवेल. माझे मूळगाव कन्नड (जि. औरंगाबाद) असून, माझ्या पालकांना आणि भावंडांना दररोज कॉल करतोय.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

प्रश्न : कोरोनाविरुद्धचा लढा कसा यशस्वी होईल? 
नीलेश निर्मळ : कठीण काळात सरकारी आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे. कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी एक व्हावे.  कोरोना विषाणू वेगाने पसरतो आणि कोणत्याही पृष्ठभागावर काही काळ टिकतो. लस तयार होण्यापूर्वी कोरोना विषाणूपासून आपण पूर्णपणे मुक्त होऊ, असे वाटत नाही. त्यामुळे सध्या घरात राहणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे खूप गरजेचे आहे.

loading image
go to top