esakal | कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली

बोलून बातमी शोधा

osmanabad corona}

नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न सोहळ्यात केवळ ५० तर अंत्यविधीस २० लोकांना परवानगी देण्यात यावी. याशिवाय दुकानात एकाच वेळी पाचच ग्राहकांना प्रवेश असेल, तर यात्रा, स्पर्धा घेण्यास परवानगी न देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी (ता. २४) प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. डीसीएचसी, सीसीसी इमारतींची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील. अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व तहसीलदार सर्व पालिकांचे मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयांनी याबाबत काम करावयाचे आहे.

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकरी ऊत्पादक कंपन्यांकडून प्रारंभ

खाजगी डॉक्टारांकरिता संशयीत रुग्णांची टेस्ट करण्याबाबत माहिती घेऊन कारवाई करणे. शिवाय गृह विलगीकरण, अलगीकरण रुग्णांवर नियंत्रण ठेवणे, कोविड बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे. रुग्ण आढळलेले प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे. सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी, पॅथॉलॉजी लॅब आदी ठिकाणाहून माहिती घेणे. 

लग्नास ५०, अंत्यविधीस २० जण- 
लग्न सोहळ्यास ५० व अंत्यविधीस २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. लग्न सोहळ्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, हॉल यांची अचानक तपासणी करण्यात यावी.

कापूस वेचणी करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा अचानक हल्ला, मांडीचा चावा घेत लाचका...

मंगल कार्यालयाचे मालक, संचालक, आयोजक यांना नोटीसा देऊन पाच हजार रुपयांचा दंड करण्यात यावा. या नोटीसमध्ये पुन्हा अशा प्रकारचा भंग केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, याबाबत समज देण्यात यावी. दुसऱ्यांदा पुन्हा उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारावा. तसेच गुन्हे दाखल करावेत. ३० दिवसांच्या कालावधीसाठी सदरचे मंगल कार्यालय सील करण्यात यावे. हॉटेल, बार कॅफेत ५० टक्के क्षमता नसावी, याची काळजी घेण्याचे आवाहन औषध प्रशासनाला करण्यात आले आहे. 

एका वेळी पाचच ग्राहक- 
दुकानात एकाचवेळी पाच ग्राहकांना प्रवेश देण्यात यावा. शासकीय कार्यालयातील दक्षता घेण्यात यावी. तोंडाला मास्क बांधलेला असावा. एस. टी. बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, जीप (टॅक्सी) यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नयेत. उद्याने सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंतच खुली असावीत. मिरवणुका, यात्रा, स्पर्धा घेण्यास परवानगी देऊ नये.